- Back to Home »
- Agriculture / Nature »
- अनाथ मतीमंद मुलांचा अभिनव प्रयोग प्लॉस्टिक कॅनचा ड्रिपसाठी वापर करुन जगवले 3 हजार वृक्ष......
Posted by : achhiduniya
10 May 2018
![]() |
[प्रतीकात्मक चित्र ] |
![]() |
[प्रतीकात्मक चित्र ] |
अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग शंकरबाबा पापडकरांनी राबविला आहे। मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या या टेकडयांच्या परिसरात पाण्याची सुविधा निमार्ण करण्यासाठी दोन विहिरी खोदण्यात आल्या तसेच विंधन विहिरीला पाणी लागल्ययामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नतर सुटलाच त्यासोबत वृक्षारोपण मोहिमेला सुध्दा चालना मिळाली. प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहचेल अशा पध्दतीने व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळयात पाणी टंचाई या दृष्टीने माथा ते पायथा या तत्त्वानुसार पावसाचे पाणी अडविण्यासाठी दगडांचा वापर करण्यात आला। त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी सहज उपलब्ध झाले. आतापर्यंत चिक्कू, डाळिंब, आवळा, फणस, आंबा, बोर, सिताफळ त्यासोबत कडुनिम, सागवन, सालई, बिबा, रक्तचंदन, बांबू, मोहा, रिठा, कडई आदी सुमारे 15 हजारपेक्षा जास्त झाडे अनाथ मतीमंद मुलांनी जगविली आहे। यावर्षीच्या तिव्र उन्हात विविध प्रजातीची झाडे जगविण्यासाठी प्लॉस्टिक रिकाम्या कॅनचा वापर करण्यात आला। साधारणता तीन ते पाच लिटरच्या कॅन ड्रिपसाठी वापरल्यामुळे 3 हजार वृक्षांचे संवर्धन झाले आहे। शंकरबाबा पापडकर यांनी अनाथ मतीमंदाच्या पुनर्वसनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन हा अभिनव मार्ग निवडला आणि यशस्वी करुन दाखविला आहे। अशा प्रकारचा प्रकल्प इतरांसाठी सुध्दा प्रेरणा तसेच मार्गदर्शक निश्चितच ठरणार आहे।
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर मो.9890157788