- Back to Home »
- Agriculture / Nature »
- केंद्रीय मंत्रालयाच्या योजनांची माहिती छायाचित्र प्रदर्शनातून नागरिकांनी घ्यावी- महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन
केंद्रीय मंत्रालयाच्या योजनांची माहिती छायाचित्र प्रदर्शनातून नागरिकांनी घ्यावी- महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन
Posted by : achhiduniya
13 August 2018
नागपुर :- शासन हे जनतेचे असून जनसेवेसाठीच ते कार्य करत असते। महिला, शहरी व ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी या समाजातील सर्व घटकांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातर्फे लोक-कल्याणाच्या योजना राबविल्या जातात। त्या योजनांची माहिती अशा छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी घ्यावी’,असे आवाहन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी आज केले। केंद्र सरकारच्या 4 वर्षापुर्तीनिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान स्थानिक सिवील लाईन्स मधील दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र येथे केंद्र शासनाच्या 4 वर्षातील कामगिरीचे व विकासकार्याची माहिती देणारे पाच दिवसीय छायाचित्र प्रदर्शन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क व संचार ब्युरोच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे आज 13 ऑगस्ट सोमवार रोजी उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या।
दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दिपक खिरवडकर याप्रसंगी सन्माननीय अतिथीच्या स्थानी उपस्थित होते। या प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर हे प्रदर्शन सुंदर व माहितीपूर्ण असल्याची भावना श्रीमती जिचकार यांनी व्यक्त केली व नागपूर वासियांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहनही यावेळी केले या उद्घाटकीय कार्यक्रमास पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक शशिन राय, आकाशवाणी नागपूच्या वृत्त विभागाच्या सहायक संचालक श्रीमती गौरी मराठे-पंडीत, फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी डॉ. मनोज सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते। 12 ऑगस्ट पासून सुरु झालेले हे प्रदर्शन 16 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान जनसामान्यांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे।
साफ नियत,सही विकास’ ही या प्रदर्शनाची मूळ संकल्पना असून मागील 4 वर्षांत केंद्र सरकारच्या सध्याच्या यशाची व्याप्ती दाखवणारे माहितीपर छायाचित्रे या प्रदर्शनात लावले आहेत। महिला सक्षमीकरण,पायभूत सुविधा, शेतकरी कल्याणाच्या योजना, भष्ट्राचाराविरोधात कडक उपाय,जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था, जी.एस.टी., स्वच्छ भारत, आयुषमान भारत, सामाजक न्याय अशा योजना संदर्भात केंद्र शासनाच्या कार्याची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळण्याची संधी उपल्ब्ध होणार आहे।
दूसरी बातमी :- चित्र प्रदर्शन व नामवंत चित्रकारांचा सत्कार कार्यक्रम १७ पासून
तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार विजय दर्डा, खासदार कृपाल तुमाने तसेच विशेष अतिथी म्हणून दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दिपक खिरवाडकर, सुप्रशिद्ध जेष्ठ चित्रकार प्रमोद रामटेके उपस्थित राहणार आहेत. यावेळी डी. के. मनोहर, पर्ण चित्रकार, एम गोपाल, जेष्ठ चित्रकार, मधुसूदन चौबे, तज्ञ सिल्सक्रिन मुद्रण, पंढरीनाथ कुकडे, चित्रकार, जयंत गायकवाड, अक्षर निर्मितीकार यांचा सत्कार करण्यात येईल. पत्रपरिषदेला माजी आमदार दीनानाथ पडोळे, देवीदास घोड़े, प्रकाश जाधव, तात्यासाहेब मते, संजय शेवाळे, प्रवीण विघरे, एस. के. सिंग, राहुल सुर्यवंशी आदी उपस्थित होते।

