- Back to Home »
- Property / Investment »
- वस्तू सेवा कर स्थानांतरण प्रकीयेयतून वंचित राहलेल्या करदात्यांसाठी विशेष नोंदणी मोहिम.....
Posted by : achhiduniya
10 August 2018
नागपुर :- 31 दिसेंबर 2017 या निर्धारित अंतिम दिनांका पर्यंत ‘प्री. जी. एस. टी.’ या श्रेणीत ज्या करदात्यांची नोंदणी झाली पंरतू स्थानांतरण प्रकीया पुर्ण झाली नाही, अशा करदात्यांसाठी 6 ऑगस्ट 2018 रोजी निघालेल्या आधिसूचनेनुसार स्थानांतरण प्रकियेची अंमलबजावणी करण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. ही करदात्यांसाठी नोंदणीची शेवटची संधी राहणार आहे। ज्या करदात्यांनी ‘आर. ई. जी.- 26’ या विहित नमुन्यात अर्ज सादर केले नाहित, अशा करदात्यांनी 31 ऑगस्ट 2018 पूर्वी कर विभागाच्या नोडल आधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन,केंद्रीय वस्तू सेवाकर, नागपूर विभागाने केले आहे. या मोहिमेसाठी केंद्रिय वस्तू, सेवा कर व केंद्रीय उत्पाद कार्यालय नागपूर-1 चे सहआयुक्त डॉ. दिनेश बिसेन (ई. मेल : dadabisen@gmail.com) व नागपूर-2 चे सहआयुक्त राकेश दीपक ( ई. मेल: deepakkumar143196@gmail.com) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे।
